पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घट

0

नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 'जैसे थे' ठेवल्या आहेत. म्हणजे नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये किमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, देशातील अन्य शहरांमध्ये वाहन इंधनाच्या दरात किंचित बदल झाल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये आग्रा, डेहराडून, नोएडा, गुरुग्राम, लखनौ आणि जयपूर या...

ट्रॉलीचा लोखंडी रॉड रोहित्राला चिकटला; वीजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू

0

राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत शॉक लागून दोन भीमसैनिकांचा करुण अंत झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विरारच्या कारगिलनगरमध्ये गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली...

१० वर्षे आणि १०० विकेट्स, मुंबई इंडियन्सच्या मलिंगाचा IPL मधील सर्वात मोठा विक्रम मोडित

0

मोहाली: आयपीएलमधील एक मोठा विक्रम मोडला गेला आहे आणि हे आयपीएल २०२३च्या १८व्या सामन्यात घडले. जिथे पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने होते. गुजरातने १ चेंडू राखून पंजाबचा ६ विकेट्स राखून पराभव केला. पंजाबची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही फ्लॉप ठरले. मात्र, यादरम्यान पंजाबचा गोलंदाजाने आयपीएलचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याने मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आणि सिनियर खेळाडू...

पडक्या गोदामात जन्म; मग स्वीकारण्यास नकार, ७ दिवसांच्या लेकीच्या हातात चिठ्ठी देत आई पसार

0

रोमः एका बंद गोदामात महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर आईचं मन बदललं. सात दिवसांतच लेक नकोशी झाली शेवटी एका रुग्णालयात मुलीला सोडून निघून गेली. मात्र, जाता-जाता मुलीच्या हातात एक चिठ्ठी ठेवून गेली. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. ही चिठ्ठीदेखील चर्चेचा विषय ठरली आहे. इटलीची राजधानी रोममधील एका रुग्णालयात महिला तिच्या नवजात...

कार बाईकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

0

अमरावती : शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते अमरावती येथे पक्षातील पदाधिकाऱ्याच्या लग्नाला खाजगी कारने जात होते. यावेळी अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील अकोला रस्त्यावर गोळेगाव नजीक त्यांची स्विफ्ट डिझायर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वारासह कारमधील दोघे असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना काल सायंकाळी सात वाजता घडली. बुलढाणा येथील हे सर्व कार्यकर्ते...

गुंतवणूकदारांच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढच तरीही कंपनीच्या नावे अनोखा विक्रम

0

मुंबई : येस बँकेच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. येस बँक ही ५० लाखांहून अधिक भागधारक असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली असून ही माहिती मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार समोर आली आहे. यानंतर टाटा समूहातील टाटा पॉवर दुसऱ्या क्रमांकावर असून कंपनीच्या एकूण भागधारकांची संख्या ३८.५ लाख आहे. याशिवाय या यादीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज तिसऱ्या क्रमांकावर...

IPL स्टार रिंकू सिंह गरीब मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देणार, १०० जणांसाठी मोफत हॉस्टेल सुविधा

0

मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरोधात शेवटच्या षटकातील पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत कोलकाता नाईट रायडर्सचा विजय साकारणाऱ्या रिंकू सिंहने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तो स्टार क्रिकेटपटू ठरला आहे. मैदानावर दमदार कामगिरी करणारा रिंकू मैदानाबाहेरही आपल्या उदार स्वभावासाठी ओळखला जातो. रिंकू आता गरीब मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये वसतिगृह बांधत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसणार; दिल्लीतील बंगला सोडावा लागणार, भूखंडही गमावला

0

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याची चर्चा होती. ही चर्चा संपत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे....

पाठय़पुस्तके किती महत्त्वाची असतात?

0

कधी कधी मला असे वाटते की आपण सर्वजण असे गृहीत धरतो की शालेय पाठय़पुस्तकांमध्ये जे काही दिले किंवा हटवले जाते, त्याचा विद्यार्थ्यांच्या विचार आणि वागण्याच्या पद्धतीत फरक पडतो. ‘द प्रिंट’च्या ओपिनियन एडिटर रामा लक्ष्मी लिहितात, ‘‘ज्ञान मिळवण्यासाठी शालेय मुले जणू काही एका पोकळीत बसतात आणि त्यांना ज्ञानासाठी इतर कोणतेही मार्ग उपलब्ध नाहीत, असे गृहीत धरणे चुकीचे आहे.’’...

प्रतीक्षा संपली! रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख पक्की

0

एका दाक्षिणात्य चित्रपटाचा मराठी रिमेक बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचेल असं कोणलाही वाटलं नव्हतं, पण रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ७५ कोटींहून अधिक कमाई करणारा ‘सैराट’नंतर हा दूसरा चित्रपट ठरला. १०० कोटींचा टप्पा पार केला नसला तरी या चित्रपटाने प्रेक्षकांना...