Home क्रीडा IPL स्टार रिंकू सिंह गरीब मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देणार, १०० जणांसाठी मोफत...

IPL स्टार रिंकू सिंह गरीब मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देणार, १०० जणांसाठी मोफत हॉस्टेल सुविधा

892
0

मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरोधात शेवटच्या षटकातील पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत कोलकाता नाईट रायडर्सचा विजय साकारणाऱ्या रिंकू सिंहने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तो स्टार क्रिकेटपटू ठरला आहे. मैदानावर दमदार कामगिरी करणारा रिंकू मैदानाबाहेरही आपल्या उदार स्वभावासाठी ओळखला जातो. रिंकू आता गरीब मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये वसतिगृह बांधत आहे.

अलिगढमधील महुआ खेडा स्टेडियममध्ये हे हॉस्टेल बांधले जात आहे. रिंकू सिंहचा मोठा भाऊ मुकुल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,
हे १०० बेड्सचे वसतिगृह लवकरच तयार होईल. या वसतिगृहात सुमारे १०० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरिबीमुळे मागे राहिलेल्या प्रतिभावान मुलांना या वसतिगृहात राहण्यासोबतच क्रिकेटचे प्रशिक्षणही मिळावे, हा रिंकू सिंहचा उद्देश आहे.मुकुल सिंह यांनी सांगितले की, रिंकू अशा गरीब मुलांसाठी वसतिगृह बांधत आहे, ज्यांना क्रिकेटमध्ये त्यांचे भविष्य घडवायचे आहे, परंतु त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. एवढेच नाही तर गरीब मुलांना रिंकू सिंग प्रशिक्षणही देणार आहे. सुमारे एक ते दीड महिन्यात या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

माझ्या भावाने गरिबी सोसली आहे, त्यामुळे गरीब मुलांच्या वेदना तो समजू शकतो. या कारणामुळे त्याला गरीब मुलांना प्रशिक्षण देऊन क्रिकेटच्या जगात चमकवायचे आहे. जवळपास शंभर मुलांसाठी हे वसतिगृह तयार करण्यात आले आहे. वसतिगृहातील मुलांना प्रशिक्षणासोबतच सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. आता कोणत्याही होतकरु मुलाचा मार्ग गरिबीमुळे रोखला नाही, असा विश्वास रिंकू सिंहच्या भावाने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here