Home क्राइम पडक्या गोदामात जन्म; मग स्वीकारण्यास नकार, ७ दिवसांच्या लेकीच्या हातात चिठ्ठी देत...

पडक्या गोदामात जन्म; मग स्वीकारण्यास नकार, ७ दिवसांच्या लेकीच्या हातात चिठ्ठी देत आई पसार

1000
0

रोमः एका बंद गोदामात महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर आईचं मन बदललं. सात दिवसांतच लेक नकोशी झाली शेवटी एका रुग्णालयात मुलीला सोडून निघून गेली. मात्र, जाता-जाता मुलीच्या हातात एक चिठ्ठी ठेवून गेली. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. ही चिठ्ठीदेखील चर्चेचा विषय ठरली आहे.

इटलीची राजधानी रोममधील एका रुग्णालयात महिला तिच्या नवजात मुलीला सोडून आली आहे. इटलीतील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिलेने एका पडिक गोदामात मुलीला जन्म दिला. या महिलेकडे स्वतःचं घर नाहीये तसंच, तिचे कुटुंबदेखील नाहीये. ती एकटीच आहे. मुलीच्या जन्मानंतर महिला पोलिसांसोबत मिलान येथील रुग्णालयात पोहोचली व तिथे असलेल्या अनाथ मुलांच्या कक्षेत तिला सोडून आली. तसंच, मुलीसोबत एक चिठ्ठीही ठेवली आहे.

महिलेने तिच्या मुलीला स्विकारण्यास नकार दिला आहे. तसंच, तिचे नावदेखील ठेवले नाहीये. मात्र, मुलीच्या हातात चिठ्ठी ठेवल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. या चिठ्ठीत महिलेने लिहलं आहे की, माझी मुलगी पूर्णपणे निरोगी असून तिच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. व सगळं काही व्यवस्थित आहे. याचाच अर्थ कोणाला मुलीला दत्तक घ्यायचे असल्यास पुढे अडचण येऊ नये म्हणून महिलेने हे आधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, इटलीत अनेकदा अशा घटना समोर येतात. गरिब महिलांकडे स्वतःचं घर नसल्याने त्या रुग्णालयात मुलांना सोडून देतात. यापूर्वी मुल नको असल्यास कचराकुंडीत किंवा बेवारस स्थितीत नवजात मुलं आढळायची. या घटना वाढल्यानंतर इटली सरकारने शहरातील रुग्णालयात व दवाखान्यात आई-वडिलांनी सोडून दिलेल्या मुलांसाठी एक व्यवस्था उभी केली. त्यामुळं आई-वडिल मुलांना त्या रुग्णालयात सोडून जातात. व पुढे रुग्णालयातडून या मुलांचा संभाळ केला जातो. किंवा एखादे जोडपे त्यांना दत्तक घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here