Home अपघात बातमी ट्रॉलीचा लोखंडी रॉड रोहित्राला चिकटला; वीजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू

ट्रॉलीचा लोखंडी रॉड रोहित्राला चिकटला; वीजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू

787
0

राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत शॉक लागून दोन भीमसैनिकांचा करुण अंत झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विरारच्या कारगिलनगरमध्ये गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण असून आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे.

विरार येथील कारगिल नगर परीसरात बौध्दजन पंचायत समितीतर्फे गुरुवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉडचा रस्त्यावर असलेल्या रोहित्राला स्पर्श झाला. त्यामुळे रोहित्रामधील वीजप्रवाह संपूर्ण ट्रॉलीमध्ये पसरला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील सहा जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८). राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) ३ गंभीर जखमींना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते, भीम सैनिक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे ,नायब तहसीलदार सीके पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. मिरवणूक संपवून परताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मर धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here