Home मुंबई ‘या’ फोन्सवर आता व्हॉट्सॲप वापरता येणार नाही…!

‘या’ फोन्सवर आता व्हॉट्सॲप वापरता येणार नाही…!

522
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : २०२० हे वर्ष पूर्ण होण्यास अगदी थोडे दिवस बाकी असून फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सॲपने जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲपसुविधा मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे.आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम वरचव्हॉट्सॲप चालू शकणार आहे.

आयफोनचा विचार करता, आयफोन 4 पर्यंतच्या सर्व मॉडेल्सवर यापुढे हे अप चालू शकणार नाही. याचाच अर्थ जे ग्राहक आयफोन 4S, आयफोन 5, आयफोन 5S, आयफोन 6 आणि आयफोन 6S वापरतात त्यांनी आपल्या आयफोनवरील ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस 9 वर अपडेट करुन घेतल्यास त्यांना व्हाटसअप वापरणे शक्य होईल.

जे युझर्स 4.0.3 पेक्षा जुन्या आपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोन वापरतात त्यांची व्हॉट्सॲप सुविधा बंद होणार आहे.मात्र,अनेक स्मार्टफोन्स यापेक्षा जुन्या आपरेटिंग सिस्टीमवर चालत नाहीत. एचटीसी डिझायर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक, मोटोरोला ड्राईड रेझर आणि सॅमसंग गॅलक्सी S2 या मॉडेल्सचा त्यात समावेश आहे. जे युझर्स जुन्या व्हर्जनवरील स्मार्टफोन वापरत आहेत ते यावर्षीच्या अखेरीपासून व्हॉट्सॲप सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

मात्र,जुन्या व्हर्जनवर अपडेट मिळाले तर काही युझर्स जुनी आॅपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या स्मार्टफोनवरही व्हॉट्सॲप वापरु शकणार आहेत.अन्यथा या युझर्ससाठी नवा स्मार्टफोन खरेदी करणे हाच उपाय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here