Home अर्थकारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घट

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घट

839
0

नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ‘जैसे थे’ ठेवल्या आहेत. म्हणजे नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये किमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, देशातील अन्य शहरांमध्ये वाहन इंधनाच्या दरात किंचित बदल झाल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये आग्रा, डेहराडून, नोएडा, गुरुग्राम, लखनौ आणि जयपूर या शहरांचा समावेश आहे. तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित करतात.

राष्ट्रीय पातळीवर दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित केल्या जातात मात्र, गेल्या वर्षभरापासून वाहन इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून १४ एप्रिल २०२३ रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ०.१७% वाढीसह प्रति बॅरल $८६.२४ वर व्यापार करत आहे. तर WTI क्रूड ऑइलची किंमत ०.१७ टक्क्यांनी वाढली आणि प्रति बॅरल $८६.२४ वर व्यापार करत आहे. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही आज अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १५ दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी तेजीने व्यवहार होताना दिसत आहे. आतापर्यंत कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ८५ डॉलर इतका वाढला होता, मात्र आता गुरुवारी प्रति बॅरल ८७ डॉलरवर पोहोचले होते.

राज्य सरकारे त्यानुसार इंधनाच्या किमतीवर व्हॅट लावतात, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार वेगवेळ्या असतात. अशा स्थितीत तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर एक एसएमएस पाठवूनही दररोज जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ वर पाठवायचा. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्या जातात ज्यामुळे त्यांची किंमत जवळपास दुप्पट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here