लाईफस्टाईल

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण

0

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट, प्लॉट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोक...

अनधिकृत जाहिरात फलकांवर संथ गतीने कारवाई

0

पुणे: शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून बुधवारी सुरुवात करण्यात आली. शहरात २ हजार ६२९ अनधिकृत जाहिरात फलक असले तरी बुधवारी केवळ २१ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत जाहिरात फलकांऐवजी कापडी जाहिरात फलक, झेंडे, भित्तीपत्रे आणि किऑक्सवरच जास्त कारवाई करण्यात आली आहे. किवळे येथे जाहिरात फलक पडून पाचजणांना जीव गमवावा...

विश्लेषण: समलिंगी विवाह कायद्याबाबत सरकार आणि संघटनांची भूमिका काय? असे विवाह किती देशांमध्ये वैध?

0

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे. एकीकडे अनेक समलिंगी जोडपी आणि एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करणारे कार्यकर्ते समलिंगी विवाहांना मान्यता मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर दुसरीकडे सरकार आणि धार्मिक नेत्यांनी समलिंगी विवाहांना विरोध केला आहे. त्यांनी अशा विवाहांना ‘केवळ विषमलैंगिक संस्था’ म्हटले आहे. समलिंगी विवाहाला सरकारचे म्हणणे...

नगर शहरातील अशांततेवर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न

0

नगरः शहरात गेल्या काही महिन्यांपासून क्षुल्लक कारणावरून तणाव निर्माण करणाऱ्या घटना धूमसू लागल्या आहेत. त्याचे निमित्त करत बाजारपेठा बंदचे आवाहन केले जात आहे. विविध राजकीय, धार्मिक नेत्यांचे दौरे वातावरण तापवू लागले आहेत. शहरातील मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून पद्धतशीरपणे सुरू असल्याचे दिसत आहे. वातावरण बिघडायला केवळ जाती-धर्माच्या मिरवणुका, उत्सवच हवेत, असे काही राहिले नाही. एखाद्याने त्याच्या...

देशाच्या प्रगतीला बाधा पोहोचणार, भारतातील ९० टक्के भाग ‘डेंजर झोन’मध्ये

0

हवामान बदलामुळे भारतात उष्णतेची लाट आली असून, ती दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. एका नव्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. अभ्यासानुसार, देशातील ९० टक्क्यांहून अधिक भाग आणि संपूर्ण दिल्ली उष्णतेच्या लाटेच्या ‘डेंजर झोन’मध्ये आहे. केंब्रिज विद्यापीठातील रमित देबनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, उष्णतेच्या लाटेने संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास...

राहुल गांधींना धक्का, शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका सूरत कोर्टानं फेटाळली

0

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत कोर्टने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी, याकरता राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. सूरतच्या सत्र न्यायालायने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल...

अवकाळी पावसाचा गावरान लिंबांना फटका

0

पुणे : अवकाळी पावसाचा लिंबांना फटका बसला आहे. सोलापूर, नगर जिल्ह्यातून होणारी लिंबांची आवक कमी झाली आहे. मध्यंतरी वातावरण बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबांच्या मागणीत पुन्हा वाढ हाेणार आहे. मध्यंतरी वातावरणात बदल झाले. अवकाळी पावसामुळे लिंबांचे नुकसान झाले. वातावरणातील बदलामुळे रसवंतीगृहचालक आणि सरबत विक्रेत्यांकडून लिंबांना असणारी...

Apple चे CEO टीम कूक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

0

Apple सीईओ टीम कूक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यामागे खास कारण म्हणजे भारतात apple चे रिटेल स्टोअर सुरु झाले आहेत. यापैकी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उदघाट्न टीम कूक यांनी केले आहे. तर आज दुसऱ्या स्टोअरचे उदघाटन ते करणार आहेत. यातच टीम कूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचा ए फोटो देखील कूक यांनी...

सूर्यग्रहण असताना गरोदर महिलांनी करू नयेत ‘ही’ कामे, आरोग्यावर होतील वाईट परिणाम

0

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेमध्ये असताना चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. या घटनेला विज्ञानासह धर्म-ज्योतिषशास्त्रामध्येही खूप महत्त्व आहे. यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी दिसणार आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख अमावस्येला यंदाच्या वर्षातील पहिले ग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणाची सुरुवात २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.०४ वाजता होणार आहे. दुपारी...

‘मेटा’कडून पुन्हा कर्मचारी कपातीचे सत्र; आधी दोन टप्प्यांत मनुष्यबळाला २१ हजारांनी कात्री

0

लोकप्रिय समाज माध्यम व्यासपीठ ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या मेटाने आतापर्यंत २१ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ही अतिरिक्त मनुष्यबळ कपात बुधवारपासून सुरू झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.मेटाने कंपनीच्या अंतर्गत संदेश यंत्रणेद्वारे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, रिॲलिटी लॅब्स आणि व्हॉट्सॲप या उपकपंन्यांच्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली...