Home मनोरंजन बॉलिवूड च कॅलेंडर हरवलं : सतीश कौशिक यांचं निधन

बॉलिवूड च कॅलेंडर हरवलं : सतीश कौशिक यांचं निधन

254
0

मुंबई :बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. यासोबतच त्यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यापूर्वी सतीश कौशिक यांना कोरोनाच्या काळात कोविडची लागणही झाली होती. …अन् ‘या’ मराठी अभिनेत्रीने 15 हजार फुटांवरून घेतली उडी, अनुपम खेर आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, मला माहित आहे ‘मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे!’ पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती! या ट्विटसोबतच त्यांनी अभिनेत्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

सतीश कौशिक यांचे चित्रपट

सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटात अशोक ही भूमिका साकारली. तसेच 1983 मध्येच रिलीज झालेल्या वो 7 दिन, मासूम, मंडी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटामधील त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. मिस्टर अँड मिसेस खिलाडी, क्यू की मैं झूठ नहीं बोलता यांसारख्या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकरली. अभिनेता गोविंदासोबत अनेक चित्रपटात सतीश यांनी काम केलं. गोविंदा आणि सतीश यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सतीश यांचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगना रनौतनं दिग्दर्शित केलेल्या इमर्जन्सी या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम ही भूमिका साकारली.

मालिकांमध्ये देखील केलं काम
सतीश यांनी चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांनी कथा सागर, मे आय कम इन मॅडम या मालिकांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी स्कॅम 2020 या सीरिजमध्ये देखील काम केलं. त्यांनी या सीरिजमध्ये मनु मुंद्रा ही भूमिका साकारली होती.

kanchan

सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here