Home क्रीडा आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? सुनील गावसकर म्हणाले,”२०० सामन्यात कर्णधारपदाची…”

आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? सुनील गावसकर म्हणाले,”२०० सामन्यात कर्णधारपदाची…”

679
0

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण आहे, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचं गावसकर यांचं म्हणणं आहे. यावर बोलताना गावसकर म्हणाले, धोनीसारखा कर्णधार कधी झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही. धोनीने १२ एप्रिलला चेन्नईत राजस्थान रॉयल्सविरोधात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळण्याचा विक्रम केला. भारताचा माजी कर्णधार धोनी ही अशी कामगिरी करणारा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.

सीएसकेचा या सामन्यात तीन धावांनी पराभव झाला होता. यावेळी गावसकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा, याबाबत चेन्नई सुपर किंग्जला चांगलं माहित आहे. हे फक्त महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वामुळं शक्य झालं आहे. २०० सामन्यांत कॅप्टन्सी करणं खूप कठीण आहे. एवढ्या सामन्यात कर्णधारपद सांभाळणं इतकं सोपं नाहीय.”

गावसकर पुढे म्हणाले, महेंद्र सिंग धोनी एक वेगळा कर्णधार आहे. त्याच्यासारखा कर्णधार कुणी झाला नाहीय आणि भविष्यातही कुणी होणार नाही. धोनी आयपीएलच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्जचा भाग राहिला आहे. २०१६-१७ मध्ये आयपीएल टीमचा अधिकारांचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली दोन वर्ष कर्णधारपदापासून निलंबित केलं होतं. त्यामुळे २०१६ मध्ये त्यांनी पुणे सुपर जायंट्ससाठी १४ सामने खेळले होते. यामुळे धोनी आयपीएलमध्ये आतापर्यंत २१४ सामन्यांमध्ये कॅप्टन्सी करू शकला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे. चेन्नईचा कर्णधार म्हणून आतापर्यंत १२० सामन्यांत विजय मिळवला असून ७९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here