Home Uncategorized ……हा लोकशाहीचा विजय -कंगना रानौत

……हा लोकशाहीचा विजय -कंगना रानौत

698
0

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. कंगनाने न्यायालयाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत स्वागत केले आहे.आपल्या कार्यालयावर केलेल्या तोडकाम कारवाईच्या विरोधात कंगनाने पालिकेत याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. कंगना रनौतने ट्वीट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो विजय हा व्यक्तीचा नसून तो लोकशाहीचा विजय आहे. ज्यांनी मला धैर्य दिले त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांचा उपहास केला त्यांचेही आभार’ अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.तसंच, ‘तुम्ही एक खलनायक म्हणून काम केले त्यामुळेच मी एक हिरो होऊ शकले’, असा टोलाही कंगनाने ठाकरे सरकारला लगावला.

न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली आहे. ‘मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे’ अशी शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिला आहे.’कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला, ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरी सरकारी प्रशासने त्याविरोधात कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन व कु-हेतूने कारवाई करू शकत नाही, असंही हायकोर्टाने पालिकेला बजावले आहे.

महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही हायकोर्टाने रद्दबातल केले आहे. तो बंगला राहण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेला काम करून द्यावे लागेल, असे आदेशही हायकोर्टाने पालिकेला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here