Home क्राइम पुंडलिकनगरात हार्डवेअर दुकानाचे शटर फोडणारा भंगार विक्रेता सहा तासात गजाआड

पुंडलिकनगरात हार्डवेअर दुकानाचे शटर फोडणारा भंगार विक्रेता सहा तासात गजाआड

0

औरंगाबाद : पुंडलिकनगरात गुरुवारी मध्यरात्री हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून सुमारे ३० हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या भंगार विक्रेत्याला पुंडलिक नगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले. शेख इरफान शेख लाल (२५, रा. गारखेडा गाव) आरोपीचे नाव आहे. त्याला बी.जी.एम. गार्डन एन-३ सिडको येथे पोलिसांनी पकडले. इरफानने त्याचा साथीदार शेख बबलु शेख रऊफ (रा. गारखेडा गाव) याच्या मदतीने चोरी केल्याचे कबुली दिली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शनिवारी सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महेश रामेश्वर तोतला (रा. न्यु एस.टी कॉलनी सिडको एन-२) यांचे पुंडलिकनगर रोडवर धरती धन प्लाझा या बिल्डींग मध्ये पुष्पक सॉनिटेशन व पेंन्टस या नावाचे हार्डवेअर दुकान व गोडाऊन आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने त्यांच्या दुकानाच्या गोडाऊनचे शटर उचकाटुन १३ हजार रुपये किमंतीचे गिझर व मिक्सर चोरी करून सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही शटर फोडणारा इरफान शेख असल्याची खात्रीलायक माहिती पुंडलिक नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार इरफानला पोलिसांनी बी.जी.एम. गार्डन एन-३ सिडको येथे पकडले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवुन त्याचा साथीदार शेख बबलु यांच्या मदतीने दुकानात चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल एक गिझर व एक मिक्सर इरफानच्या भंगाराच्या दुकानातुन जप्त करुन हा गुन्हा अवघ्या सह तासात उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिक नगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहायक फौजदार बी.डी. राठोड, जमादार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, रवि जाधव, राजेश यदमळ यांनी केली.

पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here