नागपूर: महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी; मुख्य अग्निशमन अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

0

एका महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी करीत विनयभंग करणारे नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड येथील राजनांदगाव कोतवाली ठाण्याच्या पथकाने त्यांना अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीची छत्तीसगडमधील अमितशी फेसबुकवरून ओळख झाली व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २०२१ मध्ये दोघांनीही लग्न केले.

“भाजपाकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता”, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा; म्हणाले, “मोदींच्या बुडत्या बोटीत…”

0

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. न्यू इंडिया एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांसह ४० आमदार पक्षातून बाहेर पडून सरकारमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. परंतु, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता...

प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी प्रियकर बनला चोर

0

‘प्रेयसी वारंवार पार्टी मागते तसेच नवीन कपड्याची तिची हौस पूर्ण करता यावी, यासाठी प्रियकराने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. त्या युवकाने मित्राच्या मदतीने बेलतरोडीतील धनाढ्य असलेल्या एका वृद्धेला घरात जाऊन लुटमार केली होती. या दोन्ही चोरट्यांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर झोन पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली. अर्पित रत्नाकर पोटे (२२, दर्शन कॉलनी, नंदनवन) आणि धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे...

अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही अजित पवारांचा निर्णय मान्य असेल अशा आशयाच्या प्रतिक्रिया आल्यामुळे या सगळ्या चर्चेत तेल ओतलं गेलं. या पार्श्वभूमीवर अखेर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

मुंबईमध्ये सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर; MIDC अंतर्गत रिक्त पदांसाठी कसा कराल अर्ज

0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होण्यासाठी ११ महिन्याच्या करारासह काही जागांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा आपण [email protected] या ईमेलवर सुद्धा अर्ज पाठवू शकता. ही भरती प्रक्रिया १६ जागांसाठी राबवण्यात येणार असून, उपलब्ध पदे त्यासाठी पात्रता व अन्य निकष...

लग्न न करताच इलियाना डिक्रूज होणार आई, गरोदरपणाची घोषणा करत म्हणाली…

0

इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. तर आता तिच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळवलं आहे. ती आई होणार असल्याचं तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या...

“मला चर्चेला बोलावलं तर पक्षावरची नाराजी दूर होईल, पण…”, सत्यजीत तांबे यांचं सूचक वक्तव्य

0

विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षातून ६ वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता. पण, काँग्रेस निलंबनाची कारवाई केल्याने अद्यापही नाराज आहात का? यावर आमदार सत्यजीत तांबेंनी भाष्य केलं...

आता तूर आणि उडीद डाळीचे भाव उतरणार; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

0

तूर आणि उडीद डाळ च्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. तूर आणि उडीद डाळीच्या काळाबाजारासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या पथकाने देशातील ४ राज्यांतील १० ठिकाणांना भेटी दिल्यात. या पथकाला गोदामांमध्ये तूर आणि उडीद डाळीचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्थापन केलेल्या पथकाने ही...

सुदानमध्ये हिंसाचार! लष्करी दलांतील संघर्षात १८० नागरिकांचा मृत्यू; भारतीयांच्या सुरक्षेकरता केंद्राकडून नियंत्रण कक्ष स्थापन

0

निमलष्करी (आरएसएफ) आणि लष्करी दलांमध्ये झालेल्या संघर्षात सुदानमध्ये तब्बल १८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १८०० लोक जखमी आहेत, अशी माहिती युनायटेड नेशनचे सुदानमधील परराष्ट्रमंत्री वोल्कर पेर्थस यांनी माहिती दिली. द न्यू यॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. लष्करी दल आणि निमलष्करी दल यांचं विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून सुदानमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.या युद्धामुळे पन्नास लाख लोकांनी...

मुंबई, ठाण्यातील सराईत चोरटे; डोंबिवलीत मोबाईल चोरीत अटक

0

डोंबिवली: मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या, लुटमार करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतील चार लाखांच्या मोबाईल चोरी प्रकरणात मंगळवारी अटक केली. हे सराईत चोरटे डोंबिवली पूर्व भागातील देसलेपाडा भागात वास्तव्याला होते.या दोन्ही चोरट्यांच्या अटकेने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक घरफोड्या उघड होण्याची शक्यता रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी व्यक्त केली. फिरोज उर्फ...