होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; पाच जणांचा मृत्यू

0

पिंपरी: चिंचवडच्या रावेत परिसरात असणारे होर्डिंग कोसळू जागीच पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत तीन जण गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना रावेत पोलिसांनी अटक करण्यात आली नाही. नामदेव बारकु म्हसुडे (जागा मालक), दत्ता गुलाब तरस (होर्डिंग बनविणारा), महेश तानाजी गाडे (होर्डिंग...

राष्ट्रवादीत सगळं काही ऑल इज वेल आहे का? धनंजय मुंडेंचं एका शब्दात उत्तर

0

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव चर्चेत आहे ते नाव आहे अजित पवार यांचं. अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात अजित पवार यांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांनी तुमच्या मनात जे आहे ते आमच्या मनात नाही असं सूचक उत्तर दिलं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही या विषयावर प्रतिक्रिया...

‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा

0

‘जय मल्हार’ या मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मनोरंजन सृष्टीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. तर आता या चित्रपटाच्या मानधनाबाबत त्याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

‘या’ आजारांनी ग्रस्त रुग्णांना रेल्वे तिकिटात मिळते ७५ टक्क्यांपर्यंत सूट! जाणून घ्या सविस्तर

0

भारतीय रेल्वेकडून प्रत्येक वर्गानुसार सुविधा पुरवल्या जातात. यात गरजू लोकांनाही रेल्वेकडून काही खास सवलती दिल्या जातात. आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना ट्रेनच्या तिकीटात सूट मिळत असल्याचे आपण ऐकून आहोत. पण आजारी लोकांनाही रेल्वेकडून तिकीटात विशेष सूट दिली जाते. भारतीय रेल्वेकडून काही आजारांनी त्रस्त रुग्णांना तिकीट भाड्याच सवलत देण्याची तरतूद आहे. पण कोणत्या आजारांनी ग्रस्त रुग्णांनी तिकीटात सवलत...

तब्बल ५०० दिवस अंघोळ न करता २३० फुट खोल गुहेत राहिली महिला!

0

तुम्हाला कधी आपल्या आसपास होत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो का? तुमचे कॉलेज, नोकरी, तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे कुटूंब, नातेवाईक आणि समाजापासून दूर जाऊन काही काळ शांतपणे एकांतात घालवावे असे तुम्हाला वाटते का? सोशल मिडिया, मोबाईल, इंटरनेट सर्वकाही सोडून एकांतामध्ये तुम्ही राहू शकता का?तुम्ही म्हणाल, एकांतामध्ये राहणे वगैरे ठिक आहे पण आजच्या काळात मोबाईल- इंटरनेटशिवाय कसे राहणार? आपल्या...

अजित पवार भाजपाबरोबर जातील का?

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१८ एप्रिल) अकोला येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

“अजित पवार सरकारमध्ये आले तर..” अब्दुल सत्तारांचं वक्तव्य चर्चेत, मुख्यमंत्री कोण असणार तेही केलं स्पष्ट

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपात येतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार हे शरद पवारांनाच विचारून निर्णय घेतील. ते सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे...

आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? सुनील गावसकर म्हणाले,”२०० सामन्यात कर्णधारपदाची…”

0

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण आहे, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचं गावसकर यांचं म्हणणं आहे. यावर बोलताना गावसकर म्हणाले, धोनीसारखा कर्णधार कधी झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही. धोनीने १२ एप्रिलला चेन्नईत राजस्थान रॉयल्सविरोधात चेन्नई सुपर...

सांगली बाजार समितीची निवडणूक लक्षणीय

0

सांगली: जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी सर्वात लक्ष्यवेधी निवडणुक सांगली बाजार समितीची ठरत आहे. वार्षिक एक हजार कोटींची उलाढाल आणि मिरजेसह कवठेमहांकाळ व जत हे तीन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातीन अंतर्गत साटेलोटे अंतर्गत कुरघोड्या या निमित्ताने उघड होणार आहेत. राजकीय शत्रू एकवेळ प्रबळ झाला तर...

दाभोलकर हत्या प्रकरणावर न्यायालयाच्या देखरेखीची आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाकडून दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य

0

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य केली. तपासाबाबत असमाधानी असलेल्या दाभोलकर कुटुंबीयांनी प्रकरणाचा तपास आणि खटल्यावर न्यायालयाने देखरेख कायम ठेवण्याची मागणी केली होती. तर विक्रम भावे आणि...