Home कृषी अवकाळी पावसाचा गावरान लिंबांना फटका

अवकाळी पावसाचा गावरान लिंबांना फटका

22229
0

पुणे : अवकाळी पावसाचा लिंबांना फटका बसला आहे. सोलापूर, नगर जिल्ह्यातून होणारी लिंबांची आवक कमी झाली आहे. मध्यंतरी वातावरण बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबांच्या मागणीत पुन्हा वाढ हाेणार आहे.

मध्यंतरी वातावरणात बदल झाले. अवकाळी पावसामुळे लिंबांचे नुकसान झाले. वातावरणातील बदलामुळे रसवंतीगृहचालक आणि सरबत विक्रेत्यांकडून लिंबांना असणारी मागणी कमी झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने पुन्हा लिंबांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात लिंबांच्या मागणीत वाढ झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने लिंबांच्या दरात मोठी वाढ झाली होती. किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री पाच ते दहा रुपयांना केली जात होती, अशी माहिती मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

पंधरा दिवसांपूर्वी लिंबांच्या एका गोणीला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळत होता. सध्या लिंबांच्या एका गोणीला १२०० ते १५०० रुपये दर मिळत आहे. एका गोणीत आकारमानानुसार ३५० ते ४५० रुपये लिंबे असतात. सोलापूर, नगर जिल्ह्यात लिंबांची लागवड केली जाते. अवकाळी पावसामुळे लिंबांचे नुकसान झाले आहे. बाजारात सध्या आवक होत असलेल्या लिंबांची प्रतवारी फारशी चांगली नाही. हिरव्या लिंबांचे प्रमाण जास्त असून लिंबे आकाराने लहान आहेत. लिंबांमध्ये रसाचे प्रमाण कमी आहे. तामिळनाडू, हैद्राबादमधून लिंबांची आवक होत आहे. दक्षिणेकडील राज्यातून दररोज एक हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. दक्षिणेकडील लिंबांच्या एका गोणीला १५०० ते दोन हजार रुपये दर मिळत आहे. दक्षिणेकडील लिंबू फार काळ टिकत नाही, असे जाधव यांनी सांगितले.

दक्षिणेकडील राज्यातून फळबाजारात लिंबांची आवक होत आहे. हे लिंबू फार काळ टिकत नाही. त्यामुळे उपाहारगृहचालक, रसवंतीगृहचालक, सरबत विक्रेत्यांकडून गावरान लिंबांना मागणी असते. अवकाळी पावसामुळे लिंबांचे नुकसान झाले आहे. लिंबांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. उन्हाचा कडाका वाढला आहे. मध्यंतरी पावसाळी वातावरणामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली होती. आता उन्हाचा कडाका वाढला असून पुन्हा मागणी वाढणार आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, लिंंबू व्यापारी, रोहन जाधव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here