कर्नाटक भाजपात चाललंय काय? दुसऱ्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांसह सात आमदारांना डावललं!

0

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानसभेच्या २२५ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपाकडून १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बुधवारी लगेच २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या...

भारतातून मोबाइल फोनची निर्यात ११ अब्ज डॉलरच्या पार, एकूण निर्यातीपैकी अ‍ॅपलचा सर्वात मोठा वाटा

0

भारतातून मोबाईल फोनची निर्यात ११.१२ अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. इंडस्ट्री बॉडी इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEO) च्या आकडेवारीनुसार, आयफोन निर्माता Apple चा एकूण निर्यातीपैकी निम्मा वाटा आहे. भारतातून मोबाईल फोनची निर्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४५,००० कोटी रुपयांवरून २०२२-२३ मध्ये ९०,००० कोटी रुपये (सुमारे ११.१२ अब्ज डॉलर) पर्यंत दुप्पट होणार आहे, अशी माहिती ICEO ने...

पुण्यात सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

0

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोडीत सलग १८ तास अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज (गुरुवारी) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. राष्ट्रवादी चे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी हा उपक्रम राबविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२...

‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समांथा रुथ प्रभूची तब्येत खालावली; आवाजही गेला

0

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शकुंतलम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. संमथा गेल्या काही महिन्यांपासून मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराने ग्रासली आहे. काही दिवसांपूर्वी समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या आजाराची माहिती दिली होती. आता शकुंतलम चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समंथाची तब्येत पुन्हा खालावली आहे. तिला ताप आला असून तिचा आवाजही गेला आहे....

व्हॉट्सअ‍ॅपने सुरु केले ‘Stay Safe with WhatsApp’ अभियान

0

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकांशी संवाद साधण्याचे एक साधन आहे. यात आपण एकमेकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉल् करणे, आपला फोटो किंवा अन्य गोष्टी पोस्ट करणे (स्टेट्स ठेवणे) यासारख्या बऱ्याच गोष्टी या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येतात. व्हॉट्सअ‍ॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून,ते नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने गेल्या वर्षी अनेक नवीन फीचर्स लाँच...

म्हणून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू शकलो नाही, एम एस धोनीनं सांगितलं त्यामागचं कारण

0

आयपीएल २०२३ च्या १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव केला. सीएसकेला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने सटीक यॉर्कर फेकत चेन्नईला पराभवाच्या छायेत नेलं. धोनी षटकार ठोकून सामना जिंकून देईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पंरतु, गोलंदाजाने कमाल केली आणि राजस्थान रॉयल्सला शानदार विजय...

सिडकोमध्ये नोकरीची मोठी संधी! महिन्याला ५६ हजार ते २ लाख पगार मिळणार

0

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) इथे लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी या पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यात येणार...

‘संभाजीनगर’चा धसका म्हणून नागपूरच्या सभेसाठी भाजपचे आकांडतांडव – माजी मंत्री अनिल देशमुख

0

वर्धा: संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची विराट सभा झाली होती. त्याचा धसका भाजपने घेतला आहे. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत आडवे येत आहे. सभा फोल ठरावी म्हणून त्यांचा आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला. पण सभेसाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. ही सभा विक्रमी व यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे...

लावणीकडे तुच्छतेने पाहणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक, डॉ. सदानंद मोरे यांचे मत

0

पुणे: पूर्वीच्या काळी संकुचित वृत्तीचा लवलेश नव्हता. शाहिरांनी संतांवर, पंढरीवरही लावण्या केल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत कीर्तनकारांनी संसार म्हणजे मिथ्या आणि शृंगार हा विषय त्याज्य आहे असा प्रचार केला. परंतु, शृंगार नाकारणे, लावणीकडे तुच्छतेने पाहणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. संतसाहित्य आणि...

राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात दावा, सावरकर कुटुंबियांची बदनामीची तक्रार

0

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना थेट न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सावरकर कुटुंबीयांनी घेतला आहे. या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे. इंग्लंड येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. सावरकर यांच्याविषयी मते कलुषित करण्याच्या दृष्टीने...