Home jobs सिडकोमध्ये नोकरीची मोठी संधी! महिन्याला ५६ हजार ते २ लाख पगार मिळणार

सिडकोमध्ये नोकरीची मोठी संधी! महिन्याला ५६ हजार ते २ लाख पगार मिळणार

224
0

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) इथे लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी या पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी

एकूण जागा – ३७

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत लिंकवरील जाहीरात अवश्य पाहा)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

खुला प्रवर्ग – ११८० रुपये

राखीव प्रवर्ग – १०६२ रुपये

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२३

महत्वाच्या आणि अधिकच्या माहितीसाठी सिडकोच्या cidco.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.

पदाचे नाव
पद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)10
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)3
कार्यकारी अभियंता (विद्युत)1
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत)1
सहायक परिवहन अभियंता16
वरिष्ठ नियोजक1
अर्थतज्ज्ञ1
सहायक कायदा अधिकारी4

पगार –

५६ हजारांपासून ते २ लाख ६ हजार २०० रुपये प्रतिमहिना पगार मिळणार.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0 या लिंकवर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here