Home क्रीडा म्हणून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू शकलो नाही, एम एस धोनीनं सांगितलं त्यामागचं...

म्हणून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू शकलो नाही, एम एस धोनीनं सांगितलं त्यामागचं कारण

256
0

आयपीएल २०२३ च्या १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव केला. सीएसकेला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने सटीक यॉर्कर फेकत चेन्नईला पराभवाच्या छायेत नेलं. धोनी षटकार ठोकून सामना जिंकून देईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पंरतु, गोलंदाजाने कमाल केली आणि राजस्थान रॉयल्सला शानदार विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर धोनीने पराभवाची कारणे सांगितली आणि संदीप शर्माचं कौतुक केलं.

सामना संपल्यानंतर धोनीने माध्यमांशी बोलताना म्हटलं, “मधल्या इनिंगच्या षटकांमध्ये आम्हाला जास्त स्ट्राईक रोटेशन करण्याची आवश्यकता होती. फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल नव्हती, पण विरोधी संघाकडे अनुभवी गोलंदाज होते आणि आम्ही स्ट्राईक रोटेट करू शकलो नाही. हे खूप कठीण नव्हतं आणि फलंदाजांना या आव्हानाचा सामना करायला हवा होता. आम्ही धावांचे लक्ष्य गाठण्याच्या जवळ गेलो होते, हे खूप चांगलं होतं. टूर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात याचा परिणाम आमच्या रनरेटवर प्रभावित करू शकतो.”

धोनीने म्हटलं की, “जर गोलंदाज अचूक लाईनवर गोलंदाजी करत असेल, तर फलंदाजांसाठी कठीण परिस्थिती होते. मी नेहमी गोलंदाजांच्या चुकीची वाट पाहत असतो. अशा दबावाच्या परिस्थितीत गोलंदाज काहीतरी चूक करेल, अशी अपेक्षा असते. जर गोलंदाज या दबावाला सामोरं जावून योग्य गोलंदाजी करत असेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही फलंदाजीच्या बाबतीत शेवटची जोडी होतो. आम्ही मधल्या फळीतील षटकांमध्ये धावांचा वेग वाढवण्यात उशीर केला. आम्ही अजून सिंगल धावा घेऊ शकलो असतो आणि आम्ही सुरुवातीलाच धडाकेबाज फलंदाज करु शकलो नसतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here