Home वाचककट्टा पुण्यात सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

पुण्यात सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

263
0

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोडीत सलग १८ तास अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज (गुरुवारी) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. राष्ट्रवादी चे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी हा उपक्रम राबविला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती पार पडत आहे. याच निमित्ताने आज दापोडीत एक अनोखा उपक्रम राबवत एम.पी.एस.सी आणि यू.पी.ए.स.सी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सलग १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविला जातो आहे. यामुळे विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब हे नेहमी अभ्यास करायचे. त्यांनी १८- १८ तास अभ्यास करून उच्चशिक्षित झाले. तोच संघर्ष विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि त्यांनी देखील मोठ्या पदावर भरारी घ्यावी अशी मनोकामना देखील व्यक्त केली.

या उपक्रमामुळे मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. सलग अठरा तास अभ्यासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करत आहोत. आम्ही देखील डॉ. बाबासाहेबांप्रमाणे उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदावर जायचं असल्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here