Home Uncategorized ‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समांथा रुथ प्रभूची तब्येत खालावली; आवाजही गेला

‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समांथा रुथ प्रभूची तब्येत खालावली; आवाजही गेला

245
0

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शकुंतलम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. संमथा गेल्या काही महिन्यांपासून मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराने ग्रासली आहे. काही दिवसांपूर्वी समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या आजाराची माहिती दिली होती. आता शकुंतलम चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समंथाची तब्येत पुन्हा खालावली आहे. तिला ताप आला असून तिचा आवाजही गेला आहे. समंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.

समांथाने तिच्या ट्वीटरवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे. माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आणि तुमचे प्रेम मिळविण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. दुर्दैवाने, व्यस्त वेळापत्रक आणि प्रमोशनचा माझ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे माझी तब्येत बिघडली असून मला ताप आला आहे आणि माझा आवाज गेला आहे.

समंथाच्या या ट्विटनंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत. समांथाची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, ‘लवकर बरे व्हा मॅडम. आमच्या प्रार्थना आणि प्रेम तुमच्या पाठीशी आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला सदैव तयार आहोत. तुझ्यावर प्रेम आहे. एकाने लिहिले, ‘तुझा चित्रपट हिट होईल, फक्त तुझ्या फिटनेसची काळजी घे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here