Home क्राइम ती पुन्हा आईच्या कुशीत….

ती पुन्हा आईच्या कुशीत….

72
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबईः मालवणी येथून एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला मालवणी पोलिसांनी दिवसरात्र अविरत तपास करीत अवघ्या ४८ तासांत अटक केली. सफाला नायक अशी या महिलेचे नाव असून तिच्या तावडीतून लहानगीची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे ती पुन्हा आईच्या कुशीत परतली. विशेष हा भावनिक क्षण पाहताना पोलिसांनाही आनंदाश्रू आवरले नाहीत.मालाड परिसरात घरकाम करून राहणारी सफाला ही मूळची ओडिशाची आहे. नोकरी सुटल्याने मालवणी परिसरात राहणाऱ्या एका परिचित महिलेकडे ती गेली. काम नाही राहायला जागा नाही एक दिवस राहायला द्या उद्या निघून जाईन अशी विनंती तिने केली.
महिलेच्या पतीने नकार दिला मात्र माणुसकीच्या नटाने या महिलेने तिला एक दिवस राहायला दिले. दुसऱ्या दिवशी या दाम्पत्याची एक वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना सफाला हिने तिला उचलले आणि पळ काढला. सफाला आणि मुलगी दोघीही कुठे दिसत नसल्याचे पाहून घाबरलेल्या मुलीच्या आईवडिलांनी मालवणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. लहान मुलीचे अपहरण झाल्याचे ऐकून पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला.अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत आणि पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी वरिष्ठ निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक अर्जुन रजाने, महिला उप निरीक्षक उषा खोसे याची पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीवरून या पथकांनी सफाला हिला ठाण्याच्या हिरानंदानी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here