Home अपघात बातमी दुचाकी घसरून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

दुचाकी घसरून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

378
0

सासवड (ता.पुरंदर) येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकी घसरल्याने नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला. सासवड ते हडपसर मार्गावर मोरया हॉस्पिटलसमोर शनिवारी (दि. 25) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. काजल राहुल शर्मा (वय 25) असे मयत नवविवाहिताचे नाव आहे. कुलदीप धनराज शर्मा (रा. सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. काजल शर्मा व मामा भगवती प्रसाद शर्मा (रा. सासवड) हे अ‍ॅक्टिव्हा (एमएच 12 पीबी 2318) वरून सासवड एस. टी. स्टँड येथे जात होते. दुचाकी मामा चालवीत होते व काजल शर्मा पाठीमागे कपड्याची बॅग घेऊन बसली होती.

पुणे-सासवड-जेजुरी रस्त्याने सासवड एस. टी. स्टँड येथे जात असताना पाठीमागून येणारा ट्रकने (एमएच 14 एएस 8142) दुचाकीला धडक दिली. अपघातात काजल हिचा जागीच मृत्यू झाला, तर भगवती शर्मा यांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी चालक दशरथ तुळशीराम फुलतांबकर (रा. सुलदरी, जि. हिंगोली) याला ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here