Home राजकीय ममता बॅनर्जींना मोठा धक्का निवडणुकीत काँग्रेसनं केला पराभव

ममता बॅनर्जींना मोठा धक्का निवडणुकीत काँग्रेसनं केला पराभव

403
0

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ‘तृणमूल’ला काँग्रेसच्या हातून धक्के बसत आहेत.नुकत्याच झालेल्या आणखी एका महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसनं डाव्यांसह टीएमसीचा धुव्वा उडवला. यापूर्वी दोन्ही पक्षांनी मिळून सागरदिघी विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीचा पराभव केला होता.
काँग्रेस आणि डाव्यांच्या युतीनं पूर्व मिदनापूरमधील हल्दिया डॉक इन्स्टिट्यूट स्टीयरिंग कमिटीमध्ये (HDISC) टीएमसी शून्यावर आणली आहे. युतीच्या उमेदवारांनी निवडणुकीत सर्व १९ जागा जिंकल्या आहेत, त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि टीएमसीचं खातं उघडू शकलं नाही. एचडीआयएससीच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होत असतात.विशेष म्हणजे, गेल्या HDISC निवडणुकीत टीएमसीनं सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी उलटेच निकाल लागले. पक्षानं येथील सर्व 19 जागांवर उमेदवार उभे केले. माकपचे जिल्हाध्यक्ष निरंजन सिंघी म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यावेळी मतदारांनी काँग्रेससोबतच्या आमच्या आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.’मार्चमध्ये जाहीर झालेल्या सागरदिघी पोटनिवडणुकीच्या निकालांनी टीएमसीसाठी वाईट बातमी आणली होती. पक्षाचे उमेदवार आणि सीएम बॅनर्जी यांचे दूरचेनातेवाईक असलेल्या देबाशिष बॅनर्जी यांचा काँग्रेस उमेदवार बॅरन विश्वास यांनी सुमारे 23,000 मतांनी पराभव केला. यासह पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसचं खातं उघडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here