Home महाराष्ट्र अकरावी प्रवेशापूर्वीच ऑनलाईन वर्गाला सुरुवात

अकरावी प्रवेशापूर्वीच ऑनलाईन वर्गाला सुरुवात

8
0

मुंबई : मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेल्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी 4 आठवडे लांबणीवर पडल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी सुरु होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
या लांबणीवर पडलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यास सुरु करता यावा याकरिता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासाचा हा उपक्रम या आठवड्यात सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद( एससीईआरटी)चे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.
या माध्यमातून विशेषतः विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. या ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपीठावर , कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

मराठी आरक्षणाला मिळालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया जवळपास मागील 2 महिन्यापासून रखडलेली आहे. तर दुसरीकडे इंजिनिरिंग इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा निर्णय देखील हा तिढा सुटत नाही तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाहीए. तर दुसरीकडे एमपीएससी 2019 परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संभ्रमात असलेल्या या हजारो विद्यार्थ्यांसमोरचा तिढा कधी सुटणार? हा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here