Home अपघात बातमी होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; पाच जणांचा मृत्यू

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; पाच जणांचा मृत्यू

673
0

पिंपरी: चिंचवडच्या रावेत परिसरात असणारे होर्डिंग कोसळू जागीच पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत तीन जण गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना रावेत पोलिसांनी अटक करण्यात आली नाही. नामदेव बारकु म्हसुडे (जागा मालक), दत्ता गुलाब तरस (होर्डिंग बनविणारा), महेश तानाजी गाडे (होर्डिंग भाड्याने घेणारा) आणि होर्डिंगवर असलेल्या जाहिरात करणारी कंपनी यांचा समावेश आहे.

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मुंबई- बंगळुरु महामार्गालगत असलेल्या भल्या मोठ्या लोखंडी होर्डिंग खाली पंक्चरच्या दुकानात आठ जण पावसापासून बचाव व्हावा म्हणून आश्रय घेतला. परंतु, काही कळायच्या आत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग पंक्चरच्या दुकानावर कोसळून त्या खाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला. यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोखंडी होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले असून याबाबत स्थानिकांनी महानगर पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार दिली होती. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने ते गांभीर्याने घेतले नाही म्हणून आज पाच जणांचा हकनाक बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

जखमींची नावे खालील प्रमाणे
१) विशाल शिवशंकर यादव वय-२०
२) रहमद मोहम्मद अन्सारी वय- २१
३) रिंकी दिलीप रॉय वय- ४५

मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे
१) शोभा विजय टाक- ५०
२) वर्षा विलास केदारी वय- ५०
३) रामअवध प्रल्हाद आत्मज वय- २९
४) भारती नितीन मंचल वय- ३३
५) अनिता उमेश रॉय वय- ५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here