Home मनोरंजन रोहित पवारांनी पूर्ण केला मुलाचा हट्ट…!

रोहित पवारांनी पूर्ण केला मुलाचा हट्ट…!

321
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रत्येक आई-वडील सदैव प्रयत्न करत असतात.मुलांच्या आनंदासाठी त्यांचे हट्ट देखील पूर्ण करावे लागतात.असाच बालहट्ट रोहित पवार यांनाही पूर्ण करावा लागला आहे.राजकीय क्षेत्रात अगदी सहजपणे वावरणाऱ्या आणि इतरांशी मनमिळाऊपणाने वागण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित पवार यांनी आपल्या मुलाचा कोणता हट्ट पूर्ण केला,याबद्दल रोहित यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट टाकली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की,दररोजच्या व्यस्त दिनक्रमामुळे मुलांना वेळ देता येत नाही, पण आज बऱ्याच दिवसांनी शिवांशला वेळ दिला.”बाबा किती दिवसापासून मला भेटला नाहीत तुम्ही”,असे म्हणत माझ्यासोबत केस कापायला जाण्याचा हट्ट त्याने केला.अर्थात तो पूर्ण करण्याशिवाय मला पर्यायच नव्हता!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here