Home क्रीडा पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, जर्मनीला धूळ चारत कांस्यपदक पटकावले

पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, जर्मनीला धूळ चारत कांस्यपदक पटकावले

7538
0

Marathwada Sathi : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये इतिहास नोंदवला आहे. जर्मनीच्या संघाला धूळ चारत भारताने कांस्यपदक पटकावले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. जर्मनी संघाचा 5-4 ने पराभव करत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाच्या विजयाने हॉकीमधील तब्बल 41 वर्षांपासून असलेली पदकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारताने हॉकीमधील शेवटचे पदक हे 1980 साली जिंकले होते. त्यानंतर चार दशकांनी भारताला कांस्यपदक पटकावण्यात यश आले आहे.

भारतीय संघाच्या विजयाने हॉकीमधील तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला आहे. भारताने हॉकीमधील शेवटचं पदक 1980 साली जिंकलं होतं. त्यानंतर चार दशकांनी भारताला कांस्य पदक पटकावण्यात यश आलं आहे.

टीम इंडियाचं सुरुवातीपासून जर्मनीवर वर्चस्व पाहायला मिळाले. भारताने 5-3 अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. तसेच 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले. तर चौथ्या क्वार्टरची जर्मनीने शानदार सुरुवात केली होती. 48 व्या मिनिटाला जर्मनीने चौथा गोल केला. या गोलमुळे भारताची आघाडी कमी झाली होती. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. मात्र अखेर जर्मनी संघाला 5-4 ने अस्मान दाखवत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here