Home औरंगाबाद आर्किटेक्ट, अभियंत्यांना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार

आर्किटेक्ट, अभियंत्यांना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार

83
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :
बांधकाम परवानगी घेण्याकरिता महापालिकेचे अक्षरश: उंबरठे झिजवावे लागतात. परंतु आता नगर विकास विभागाने आर्किटेक व अभियंता यांना स्वतःच्या जोखमीवर परवानगी देण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.


महापालिकेकडून बांधकामाची परवानगी घेणे म्हणजे मोठे आव्हानच असते. येथे नागरिकांचे मोठी हेळसांड होते. परवानगी करिता अक्षरशा महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागतात. परंतु आता छोट्या बांधकाम धारकांना (200 चौरस फूट) पर्यंत बांधकाम परवानगी करिता महापालिकेत जाण्याची गरज नाही. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने नुकताच तसा आदेश काढला आहे.


मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये मंगळवारपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. परवानगी घेण्याकरिता बांधकामाचे नकाशे पूर्ण करून प्रस्ताव दाखल केल्यानंतर दहा दिवसात त्याला मंजुरी द्यायची आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देखील अभियंता व आर्किटेक्ट यांना
देण्यात आला आहे.


यात निवासी, व्यवसायिक, वाणिज्य आदी मालमत्तांचा देखील समावेश आहे. यापैकी कुठल्याही परवानगी करिता आता मनपात जाण्याची गरज नाही. थेट आर्किटेक अभियंत्यांकडून परवानगी मिळवता येणार आहे.
फेऱ्या मारण्याची गरज नाही.


आजच्या परिस्थितीत बांधकाम परवानगीची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. कुणाला परवानगी घ्यायची असल्यास महापालिकेत चकरा माराव्या लागतात. यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु या सर्वांपासून आता नागरिकांना मुक्ती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here