Home छत्रपती संभाजी नगर हिमायतबागेतील झाडांची कत्तल कंत्राटदारावर कारवाईची आयुक्तांकडे मागणी

हिमायतबागेतील झाडांची कत्तल कंत्राटदारावर कारवाईची आयुक्तांकडे मागणी

410
0

छत्रपती संभाजीनगर :शहराचे ऑक्सिजन हब अशी ओळख असलेल्या, जैववैविध्याने नटलेल्या ऐतिहासिक हिमायतबागेत अवैधरीत्या वृक्षतोड सुरू आहे. ही झाडे आंब्याच्या बागेचे कंत्राट घेणाऱ्यांनी तोडली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अम्ब्रेला फाउंडेशनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.हिमायतबाग परिसरातील मोसंबी बागेशेजारी असलेले देशी प्रजातीचे वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामध्ये काशीद, जांभूळ, खैर आदींसह अन्य झाडांचा समावेश आहे. नियमानुसार कोणतेही झाड तोडायचे असल्यास, महापालिका प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.मात्र, परवानगी न घेता वनसंपदा संपवण्याचा प्रयत्न आंब्याची बाग घेणाऱ्या कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी अम्ब्रेला वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य अॅड. संदेश हांगे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here