Home क्राइम छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

364
0

छत्रपती संभाजीनगर :देशभरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा भागात बुधवारी रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली होती.दरम्यान या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त ABP माझाने दिलं आहे. ५१ वर्षीय व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्याना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या करणामुळे झाला हे मात्र अजून पर्यंत समजलं नाही.किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री १२.३० वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली होती.
छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात बुधवारी रात्री हाणामारीची घटना घडली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास करण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here