Home मुंबई भाजपला रामराम ठोकत केला शिवसेनेत प्रवेश…!

भाजपला रामराम ठोकत केला शिवसेनेत प्रवेश…!

87
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी आहे.मात्र,आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ वर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे आहेत. तसेच ते काँग्रेसचे माजी नगरसेवकही होते.

दरम्यान,यापूर्वी समीर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता.मात्र, भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here