Home क्रीडा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

565
0

हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौर यांचं शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निध झालं. गौस हे 53 वर्षांचे होते आणि त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मोहम्मद सिराज भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. तिथे भारतीय संघ बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्याला मायदेशी परतता येणार नाही. परिणामी तो वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नाही.

मोहम्मद सिराजचे वडील रिक्षाचालक होते. हालाखीच्या परिस्थितीत असतानाही केवळ मुलाचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कमाई सिराजसाठी खर्च केली हीत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर संघाकडून खेळणारा मोहम्मद सिराज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. परंतु मुलाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न अधुरं राहिलं.

वडिलांच्या निधनानंतर मोहम्मद सिराजने एक भावूक मेसेज दिला आहे. “हा मोठा धक्का आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला. मला देशासाठी खेळताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि मला आनंद आहे की, मी त्याचं स्वप्न पूर्ण करुन त्यांना आनंद दिला.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here