Home Uncategorized कुंभार समाजाच्या अस्तित्वासाठी थापटन मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे – अर्जुन दळे

कुंभार समाजाच्या अस्तित्वासाठी थापटन मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे – अर्जुन दळे

203
0

बीड
बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस केलेली आहे ही प्रलंबित मागणी केंद्राने पूर्ण करावी, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून मूर्त्या तयार करण्यासाठी घातलेली बंदी तात्काळ उठविण्यात यावी या प्रमुख मागणीसह कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता कुंभार समाजाचा भव्य मोर्चा सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स बीड येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले आहे. समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी कुंभार समाजाने वज्रमूठ आवळली असून हजारोच्या संख्येने कुंभार समाज बांधव या मोर्चात उपस्थित राहणार असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अर्जुन दळे यांनी म्हटले आहे की, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या कुंभार समाजावर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही अन्याय झालेला आहे. कुंभार समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य होणे आवश्यक आहे. मात्र राज्य आणि केंद्र शासन सातत्याने कुंभार समाजाचा आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनविणारी धोरण अवलंबित आहे. त्यामुळे कुंभार समाजाची प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच जास्त होऊ लागली आहे. कुंभार समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आणि राजकीय क्षेत्रात उन्नती होण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कुंभार समाजाला न्याय देणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्त्या तयार करण्यासाठी घातलेली बंदी तात्काळ उठविण्यात यावी, बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस केलेली आहे ही प्रलंबित मागणी केंद्राने पूर्ण करावी, संत गोरोबाकाका यांचे जन्मस्थान तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद या तीर्थक्षेत्र अ दर्जा द्यावा, माती वाहतूक व वीट भट्टी परवान्यांच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कुंभार समाजात ओळखपत्रावर परवाना मिळावा, कुंभार समाजातील ६० वर्षा पेक्षा ज्येष्ठ कारागिरांना शासनाकडून मानधन मिळावे आदी कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा “थापटन मोर्चा”काढण्यात येणार असून या मोर्चा कुंभार समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, जिल्हा कार्याध्यक्ष जालिंदर करडकर, विभागीय उपाध्यक्ष जालिंदर रेळेकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वाडेकर, युवक जिल्हा अध्यक्ष अनिल देवतरासे, सोशल मीडिया प्रमुख अशोक राऊत, जिल्हा संघटक मनोहर इटकर,, माजी जिल्हाध्यक्ष राम पोपळे, ज्येष्ठ मार्गदर्शक गौतम चित्रे, अॅड. शिवराज कुंभार, उत्तरेश्वर तडसकर, विठ्ठल गोरे, रावसाहेब देशमुख यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here