Home अंबाजोगाई वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणा-राजकिशोर मोदी

वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणा-राजकिशोर मोदी

169
0

अंबाजोगाई
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने स्ञी शिक्षणाचा पाया रचणा-या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणने गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

सहकार भवन येथे रविवारी आयोजित जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे प्रारंभी बालिका दिन व महिला शिक्षण दिनानिमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सावित्रीमाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.तसेच सावित्रीमाईंनी मुली व स्ञियांसाठी शिक्षणाची वाट खुली केली आहे. सावित्रीमाईंचे विचार कृतीत आणण्याची खरी गरज आहे आणि त्याची जबाबदारी तरूण पिढीने घेतली पाहिजे.असे सांगून ग्रामीण भागातील शिक्षणापासुन वंचित असलेल्या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.हे कार्य झाले तरच साविञीमाईंना खरी आदरांजली आहे. महिला स्वावलंबी झाली पाहिजे,ती स्वत:चे पायावर उभा राहिली पाहीजे,ती उद्योजक झाली पाहिजे अशा विधायक भूमिकेतून आम्ही सहकारी यांनी मिळून अंबाजोगाईत क्रांतीज्योती साविञीमाई फुले महिला नागरी पतसंस्था सुरू केल्याचे सांगून या पतसंस्थेचे माध्यमातून अंबाजोगाईत अनेक उद्योजक महिला भगिनींना आर्थिक पाठबळ मिळाले, तसेच श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमातून गोरगरीब व गरजू कुटुंबातील मुली आज दर्जेदार शिक्षण घेत आहेत याचे मोठे समाधान आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मोदी यांनी यावेळी केले.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,नगरसेवक तथा शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,अशोक देवकर,शेख खलील, दिनेश घोडके,सचिन जाधव,शेख मुख्तार, प्रताप देवकर,जुनैद सिद्दीकी,काजी शाकेरभाई,माऊली वैद्य,शरद काळे,अमोल मिसाळ,सिद्धार्थ साबळे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here