Home तंत्रज्ञान तुम्ही स्मार्टवॉच वापरता का? जर वापतात असाल तर तुम्हालाही तणाव आणि भितीचा...

तुम्ही स्मार्टवॉच वापरता का? जर वापतात असाल तर तुम्हालाही तणाव आणि भितीचा सामना करावा लागेल.

365
0

अलिकडे अनेकांच्या हातात स्मार्टवॉच दिसते. वेळेबरोबरच आरोग्यासंदर्भातील अनेक संकेत देत असल्याने स्मार्टवॉच चा वापर वाढला आहे. बर्‍याच कंपन्यांचा असा दावा आहे की स्मार्टवॉच लोकांचं हेल्थ चांगल्या प्रकारे मॉनिटर करु शकतात.

पण याच स्मार्टवॉच वापराबाबत डॉक्टरांनी इशारा दिला आहे. स्मार्टवॉच लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करु शकतात. अलिकडे लोकांनी आपल्या आरोग्याला स्मार्टवॉचच्या इंडिकेशनशी जोडायला सुरुवात केली आहे. स्मार्टवॉचच्या साईड इफेक्टबाबत एक प्रकरण समोर आले आहे.

जर्मनच्या तरुणाला आधी कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता, मात्र तरीही त्याला स्मार्टवॉचमुळे तणाव आणि भितीचा सामना करावा लागला. याचे कारण असे त्याने आपल्या स्मार्टवॉचच्या इलेक्ट्रोकार्डियोग्रामवर सतत नजर ठेवायला सुरुवात केली होती. ज्याच्यामुळे त्याला वाटू लागले त्याच्या छातीत दुखत आहे. त्याच्या रक्तप्रवाहावर संशय होऊ लागला आणि रक्तप्रवाह कमी होत असल्याचा संशय येऊन त्याने रुग्णालयात धाव घेतली. जिथे तपासात कळले की, स्मार्टवॉचचे इलेक्ट्रोकार्डियोग्राम आणि 12 लीड इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) समान आहेत. याचा अर्थ स्मार्टवॉच आणि इसीजीचा रिपोर्ट ठिक होता. तो पूर्णपणे बरा आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाहीय. त्याला बराचवेळ समजावून आणि तो ठणठणीत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.डॉक्टरांनी त्याला कसलाही आजार नसल्याचे सांगितले आहे. एवढेही सांगितले की, त्याला पुढेही कोणत्या उपचाराची गरज नाही.

मेडिकल केस रिपोर्टस जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार मेडिक्सने सांगितले की, विद्यापिठाच्या विद्यार्थ्याने आपले हृदयाचे स्वास्थ तपासण्यासाठी स्मार्टवॉच खरेदी केले होते. जेव्हा डेनिश फुटबॉलर क्रिश्चियन एरिक्सनला एका मॅच दरम्यान कार्डिएक अरेस्ट आला होता. तेव्हापासून तो घाबरला होता. त्यामुळे तो स्मार्टवॉचच्या माध्यमातून आपल्या हृदयाच्या स्वास्थ्यावर नजर ठेवत होता. त्याने गुगलवर स्मार्टवॉचमध्ये ईसीजी मॉनेटरवर हार्ट अटॅक कसा कळेल हे जाणून घेतले होते. खरंतर ईसीजी ही एक साधी टेस्ट आहे. ज्याचा उपयोग हृदयाची गती आणि इलेक्ट्रीकल अॅक्टिव्हिटीचा तपास करण्यासाठी केला जातो.

डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात आलेला विद्यार्थी खूप घाबरलेला दिसत होता. तो प्रचंड चिंतेत होता. इमरजेन्सी विभागात पुढील तपासात आढळले की, विद्यार्थ्याचा हार्ट रेट 88 प्रतिमिनीट नॉर्मल होता आणि हृदयासंदर्भात कोणताही आजार नव्हता. तज्ज्ञांनी अनेकदा स्मार्टवॉचच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह केले होते. काहींचे म्हणणे आहे की, यामुळे त्यांचे वजन वाढू शकते. 2016मध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रात ज्या लोकांनी वर्षभर फिटबिट घातला होता. त्यांच्या वजन आणि रक्तदाबावर कोणताही बदल दिसला नाही. द लांसेटच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनी सांगितले की. ट्रॅकर्सचे फिचर असूनही याबाबत कमी पुरावे आहेत की, स्मार्टवॉच आरोग्यात सुधारणा आणण्याची मदतगार ठरु शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here