Home अंबाजोगाई अंबाजोगाई खगोल दुर्बिण निर्मीती कार्यशाळेला प्रारंभ

अंबाजोगाई खगोल दुर्बिण निर्मीती कार्यशाळेला प्रारंभ

717
0

अंबाजोगाई
जिल्हास्तरीय खगोल दुर्बिण निर्मिती कार्यशाळेला मान्यवरांच्या उपस्थित प्रारंभ झाला .
येथील गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या सभागृहात गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खगोल दुर्बिण निर्मिती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रा.एस. एस.देशमुख , प्रा . भिमाशंकर शेटे , एस.के.बेलुर्गीकर ,
यशोदा राठोड , शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता कापसे , श्रीमती पठाण, मुख्याध्यापिका वर्षा चौधरी , अलका साळूंळे, मुख्यमार्गदर्शक हेमंत धानोरकर , एस .के. निर्मळे यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपत व्यास होते .
या वेळी प्रा .एस.एस.देशमुख , प्रणिता कापसे ,
गणपत व्यास यांनी मनोगत व्यक्त केले .
सुरुवातीला सावित्रीबाई फुले , स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यातआला . गटशिक्षण अधिकारी प्रा . चंदन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पवार यांनी केले . शेवटी
एस.एम. सोनटक्के यांनी सर्वांचे आभार मानले .
कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख आर.डी. गिरी , डी.आर. काटे , के.जी. पसारकर,
सुंदर नेहरकर , सूर्यकांत टेकाळे , प्रकाश शिंदे , गणेश काळे , उदय स्वामी , गौरव कांबळे , नमित सुराणा , गौरव कांबळे यांनी सहकार्य केले .
या कार्यशाळेत पंचावन्न शिक्षकांना दुर्बिण निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले . दुर्बिणीतून आकाशातील गृह व
तारे दाखविण्यात आले . खगोलतज्ञ हेमंत भालेराव (धानोरकर ) यांनी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here