Home मुंबई भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त घरीच अभिवादन करा – भीमराव आंबेडकर

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त घरीच अभिवादन करा – भीमराव आंबेडकर

424
0

मुंबई
आपल्या पूर्वजांच्या 1/1/1818 रोजीच्या शौर्य दिना निमित्त दरवर्षी 1 जानेवारी रोजी राज्यातून / देशभरातून लाखों भीम अनुयायी व जनता भीमा कोरेगाव (पुणे) येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात, या शौर्य दिनाचे व्यवस्थापन / नियोजन अनेक वर्षापासून भारतीय बौध्द महासभा । समता सैनिक दल आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा संघ च्या सहयोगाने करीत असतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट आले आहे ते अद्याप टळले नाही, कोरोनावरची लस अद्याप आलेली नाही. आता जगात दुसरी लाट आली असल्यामुळे कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून तमाम भीम अनुयायांना व जनतेला खालीलप्रमाणे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. सर्व भीम अनुयायी व जनतेने विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव (पुणे) न येता, आपल्या स्थानिक ठिकाणी असलेल्या ( उदा. शहर, गाव, वार्ड, परिसर, बुद्ध विहार, स्मारक इत्यादी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी विजय स्तंभाच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन, विनम्र अभिवादन करावे. या अभिवादनाचे फोटो सोशल मिडियावर, व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठवावेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणुन अभिवादन करताना, प्रत्येकाने शासनाच्या । स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार मास्क लावून, फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आवाहनानुसार कोणतीही सभा होणार नाही, फक्त समता सैनिक दलाची मानवंदना होईल. या मानवदनेसाठी व व्यवस्थेसाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निवडक केंद्रीय वरिष्ठ पदाधिकारी व केवळ पुणे जिल्ह्यातील (पूर्व व पश्चिम) समता सैनिक दलाचे निवडक सैनिक यांची पोलिस, प्रशासन याना सहकार्य करण्याकरिता नेमणूक करण्यात येणार आहेत. तरी, भीम अनुयायांनी व जनतेने भीमा कोरेगाव ( पुणे) येथे न येता, वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना आपल्या स्थानिक ठिकाणी, घरीच अभिवादन करावे, ही नम्र विनंती पत्रका द्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here