Home इतर बिल्डरने केली चक्क चंद्रावर जमीन खरेदी

बिल्डरने केली चक्क चंद्रावर जमीन खरेदी

54
0

मराठवाडा साथी न्यूज

उल्हासनगर : चित्रपट क्षेत्रात वावर असलेल्या व व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक ‘राम वाधवा यांनी सॅटेलाइट फोनसह चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

चित्रपट क्षेत्रात वावर असलेले व व्यवसायाने बिल्डर असलेले वाधवा यांनी दिवाळीपूर्वी शहरवासीयांना गुड न्यूज दिली. भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी चक्क चंद्रावर ४३ हजार ५०० स्क्वेअर फूट जागा खरेदी केली. चंद्रावरील जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी जयपूरमधील ‘सुरभी असोसिएट’ या कंपनीला जमीन खरेदीचे काम दिले होते.

कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर खरेदीची पावती मिळाली असून, त्यासोबत बीएसएनएल कंपनीकडे १ लाख ७० हजारांचा भरणा केल्यानंतर एक सॅटेलाइट फोन मिळाला. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या फोनचा संपर्क होणार असून आउट गोइंगचा दर मिनिटाला ३५ रुपये असल्याची माहिती वाधवा यांनी पत्रकारांना दिली आहे. मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जमीन खरेदी केल्याची माहिती वाधवा यांनी देऊन सॅटेलाइट फोनसह चंद्रावरील जमीन खरेदीची कागदपत्रे पत्रकारांना दाखविली.

यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत, अभिनेता शाहरूख खान तसेच आग्रा येथील एका व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केली असून, वाधवा यांचा देशात चौथा क्रमांक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here