Home मनोरंजन कॅटरिनाने मारली विकी कौशलला मिठी…?

कॅटरिनाने मारली विकी कौशलला मिठी…?

4981
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या अनेक महिन्यांपासून समोर येत आहेत.त्यातच आता कॅटरिनाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.नुकतेच कॅटरिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बटरफ्लाय फिल्टरसह एक फोटो शेअर केला आहे.यात ती कुणाला तरी मिठी मारताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून ती विकीला मिठी मारत असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला.
कॅटरिनाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे लोकांनी #Vickat हा हॅशटॅग देखील सुरू केला.

दरम्यान,या अगोदर कॅटरिनाने बहिणीसोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक फोटो शेअर केला होता.यात एका फोटोत विकी कौशल दिसत आहे. विशेष म्हणजे लोकांना फोटोत विकी दिसल्यानंतर कॅटरिनाने तो फोटो सोशल मीडियावरून काढून टाकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here