Home परभणी परभणीच्या भुमिपुत्राकडून देशाला लस ..

परभणीच्या भुमिपुत्राकडून देशाला लस ..

567
0


परभणी : परभणीच्या सुपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी कोरोनावर देशाला लस दिली आहे . आपल्या देशात इंग्लिश मीडियमला नको तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे. आपला मुलगा मराठी माध्यमातून शिकला, तर त्याचं पूर्ण शिक्षणचं वाया गेल आहे.असा पालकांमध्ये बदल झालेला दिसतो .जिल्हा परिषदेची शाळा आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या संचालक पदापर्यंत भरारी घेतली आहे. परभणीचे भुमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक असून त्यांनी देशातील कोरोनावरील दोन लशींना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमान आहे.

डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचा जन्म परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी या छोट्याशा गावात झाला.  सुरुवातीचं शालेय शिक्षण बोरी येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केलं. दहावीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद ( बोरी) येथे  शाळेत पूर्ण केले.   त्यांनी पुढील शिक्षणासाठी नांदेड आणि  नागपूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून फार्मसीची पदवी घेतली .  नागपूर विद्यापीठातून पीएचडी पुर्ण केलं.स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. त्यानंतर युपीएससी परिक्षा उत्तीर्ण करून त्यांनी डिसीजीआयच्या संचालकपदी मजल मारली. आणि काल त्यांनी दिल्ली इथे पत्रकार परिषद घेऊन कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनला परवानगी दिली आहे. 

जिल्हा परिषदेचा विद्यार्थी ते डिसीजीआयच्या संचालकपद त्यांचा प्रवास खरंच प्रेरणा देणारा आहे. घरची परिस्थिती जरी साधारण असली तरी डॉ. वेणुगोपाल सुरुवातीपासून आभ्यासात हुशार होते. लहानपणापासूनचं त्यांचा कल औषध निर्मितीकडे होता. म्हणूनच त्यांनी त्याचं पदवीचं शिक्षण फार्मशीमध्ये पूर्ण केलं. या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केलं आहे. मुलाच्या यशानं अभिमानानं मान उंच झाली आहे असं वेणुगोपाल यांच्या आईवडिलांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here