Home मनोरंजन ‘मलायका’ झाली शेफ…!

‘मलायका’ झाली शेफ…!

76
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.कारण आता अर्जुन आणि मलायका यांनी देखील त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे.सध्या हे दोघेही गोव्यामध्ये अमृता अरोरा हिच्या ह़ॉलिडे होमवर असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान,मलायका आणि अर्जुन त्यांच्या आयुष्यातील खास क्षण अनुभवत आहेत.

नुकतेच रविवारी(३ जाने.)अर्जुनने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने बनवलेल्या काही पदार्थांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘जेव्हा ती रविवारी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते…’,असे कॅप्शन त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला दिले आहे.हिच स्टोरी मालयकानेही रिपोस्ट केली आणि त्यावर हृदयाच्या आकारेच इमोजी वापरत त्याच्याप्रती प्रेम व्यक्त केले आहे.

न्यूयॉर्क व्हेकेशन दरम्यान मलायका आणि अर्जुनने २०१९ मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here