Home अर्थकारण महावितरणाची मराठवाड्यात कारवाई :१ कोटी ३४ लाख रूपयांची वीज चोरी उघड

महावितरणाची मराठवाड्यात कारवाई :१ कोटी ३४ लाख रूपयांची वीज चोरी उघड

737
0

औरंगाबाद: महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाने मराठवाड्यातील आठ जिल्हयात जानेवारी २०२३ मध्ये वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली आहे.यामध्ये २४२ वीज मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. या वीज चोरी प्रकरणी एक कोटी ३४ लाख ६६हजार रूपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली. वीज चोरीच्या अनुमानित वीज बिल दंडाची रक्कमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्यूत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात जानेवारी २०२३ या कालावधीत दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज मीटरची तपासणी करण्यात आली. विद्यूत कायदा २००३ नुसार कलम १२६अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम १३५मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.यामध्ये औरंगाबाद शहरात ३६.४३ लाख रूपये वीज चोरी, औरंगाबाद ग्रामीण १२.६६ लाख रूपये वीज चोरी, जालना जिल्हा ९.४४लाख रूपये वीज चोरी, लातूर जिल्हा ३७.५५ लाख रूपये वीज चोरी, बीड जिल्हा ८.२५लाख रूपये वीज चोरी, उस्मानाबाद जिल्हा ८.१४ लाख रूपये वीज चोरी, नांदेड जिल्हा ९.७६ लाख रूपये वीज चोरी,हिगोंली जिल्हा ५.०१लाख रूपये वीज चोरी,परभणी जिल्हा २०.०७लाख रूपये वीज चोरी केलेल्या अनुमानित दंडाची एकूण एक कोटी ३४ लाख रूपये आहे.ग्राहकांनी दंड न भरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले तसेच कार्यकारी संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी प्रमोद शेवाळे यांनी वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणाना केले आहे.पुढील काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहिम राबविण्याचे निर्देश महावितरणाला दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here