Home इतर नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट…!

नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट…!

321
0

मराठवाडा साथी न्यूज

नाशिक : नाशिकमधील खुटवडनगर परिसरातील धनदायी कॉलनीमधील प्लॉट नंबर १२६ येथे सकाळी वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागून भीषण स्फोट झाला आहे.या घटनेत एका कुटुंबातील ३ जण जखमी झाले असून स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाली आहेत.

दरम्यान,झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या घरांच्या आणि गाड्यांच्या काचा देखील फुटल्या.स्फोटामध्ये घरमालक बळीराम पगार,पुष्पा पगार(पत्नी),रुहान(नातू) हे जखमी झाले. स्फोट झाल्याबरोबर आजूबाजूंच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले.जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी अंबड पोलीस पंचनामा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here