Home Uncategorized कुणाल खेमूच्या ‘कंजूस मक्खीचूस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

कुणाल खेमूच्या ‘कंजूस मक्खीचूस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

398
0

चित्रपटगृहात नाहीतर ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

‘कंजूस मक्खीचूस’ चित्रपटाच्या ट्रेलरमुळे कुणाल खेमू चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये कुणाल एका कंजूस व्यक्तीचे पात्र साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे.कंजूस मक्खीचूस या चित्रपटात कुणाल खेमूसह श्वेता त्रिपाठी,पीयूष मिश्रा, अलका अमीन आणि दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.चित्रपटाचा ट्रेलर कुणाल खेमूने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर खूपच दमदार आहेत. ट्रेलरवरून चित्रपट किती भन्नाट असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या ट्रेलरमध्ये तुम्हाला कॉमेडी, ड्रामा, डान्स, इमोशन असं सर्व काही पाहायला मिळत आहे.कुणालने ट्रेलरला एक कॅप्शन देखील दिले आहे. ऑफिशिअल ट्रेलर हा आहे खूप कंजूस पण कुटुंबावरचे प्रेम दाखवण्यात कधीच कंजूषपणा करत नाही! #KanjoosMakhichoos मधील कथा जमनाप्रसाद पांडे यांची आहे, २४ मार्च रोजी फक्त #ZEE5 वर प्रदर्शित होत आहे’, असे कुणालने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.कुणाल खेमू आणि शश्वेता त्रिपाठी यांचा कंजूस मक्खीचूस हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कुणाल या चित्रपटासाठी नेटकरी उत्सुक आहेत. तसेच त्यांना या चित्रपटाकडून आणि कुणालकडून खूप अपेक्षा आहेत.

https://www.instagram.com/reel/CpuLIxsr8-4/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here