Home देश-विदेश अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांचा हल्ला

अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांचा हल्ला

370
0

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटॉल हिल अर्थात अमेरिकेच्या संसदेवर आंदोलकांनी हल्ला केला. हे आंदोलक डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असून, अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव घोटाळ्यामुळे झाला असल्याचं मानणारे आहेत.नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला असून, डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. येत्या 20 जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी होणार आहे त्याच्या पार्शभूमीवर हा हल्ला येथील संसदेवर झाला आहे.

हल्ला करणाऱ्या ट्रम्प समर्थकांना बायडेन यांचा विजय मान्य नाही. या निवडणुकीत, मतमोजणीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासूनच केला आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. ट्रम्प यांनी आक्षेप घेतल्यामुळे अनेक ठिकाणच्या मतमोजणीला उशीरही झाला; मात्र बायडेन यांचाच विजय झाला असल्याचं तिथल्या यंत्रणांनी घोषित केलं. पण ट्रम्प यांनी प्रत्येकवेळी विरोध दर्शवल्याने त्यांचे आंदोलक रस्त्यावर उतरले असल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here