Home देश-विदेश नाटू नाटू’ च्या गाण्यावर टेस्लाच्या गाड्याही नाचल्या पहा भन्नाट व्हिडीओ

नाटू नाटू’ च्या गाण्यावर टेस्लाच्या गाड्याही नाचल्या पहा भन्नाट व्हिडीओ

291
0

भारताला ज्या गाण्यानं ऑस्कर मिळवून दिलं त्या नाटू नाटूची चर्चा अजुनही सुरुच आहे. केवळ भारतीयांनाच नाहीतर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये नाटू नाटूनं चाहत्यांना वेडं केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआऱआऱ या चित्रपटानं जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.आता नाटू नाटू वर सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. ऑस्करमध्ये नाटू नाटूचे सादरीकरण झाले तेव्हाही राजामौली आणि त्यांच्या टीमवर कौतूकाचा वर्षाव झाला होता. प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीनं देखील RRR च्या नाटू नाटूला आगळी वेगळी सलामी दिली आहे. त्यांनी केलेलं कौतूक राजामौली यांना देखील भावलं आहे.
लेडी गागा आणि रिहाना यांच्यासारख्या कलाकारांना मागे सोडत राजामौली यांच्या चित्रपटानं बाजी मारल्याचे दिसून आले. नाटू नाटूला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट गाणं या प्रकारामध्ये पुरस्कारानं घोषित करण्यात आले होते. त्यानंतर संबंध देशामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. आता राजामौली यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये १५० पेक्षा टेस्लाच्या कार नाटू नाटू गाण्यावर चमकत असल्याचे दिसून आले आहे.
गाड्यांच्या टायटलमध्ये RRR असे लिहिल्याचे दिसत आहे. एम एम किरवानी यांनी लिहिलेल्या नाटू नाटू गाणं जगभरामध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमधील गाड्यांची लाईट चालू बंद होते आहे. यासगळ्यासाठी राजामौली यांनी टेस्ला यांना धन्यवाद म्हटले आहे. राजामौली यांनी लिहिलं आहे की, नाटू नाटू ला टेस्लानं सलामी देणं हा माझा केवळ विचार होता. पण आता जे दिसते आहे ते भन्नाट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here