Home राजकीय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, प्रशांत दामले ठरले विजयी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, प्रशांत दामले ठरले विजयी

289
0

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुका हा गेले काही दिवस चर्चेचा विषय होता. या निवडणुकीसाठी रविवारी (१६ एप्रिल) रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर या केंद्रांवर मतदान झाले. तर काल रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी झाले आहेत.

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी सुरू होती. अखेर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी ८ जागांवर प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’च्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या ‘आपलं पॅनल’चे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने विजयी ठरले आहेत. तर मुंबई उपनगरांत दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या असून दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत.

प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यांच्या या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे.तर प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’मध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे हे कलाकार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here