Home क्राइम वडेट्टीवारांचे पासपोर्ट ‘जप्त’…!

वडेट्टीवारांचे पासपोर्ट ‘जप्त’…!

529
0

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे.भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता.या संदर्भात भांगडिया यांनी खूपदा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत वडेट्टीवार यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र,तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा त्यांचा पर्मनंट अॅड्रेस म्हणून दिला होता.तसेच तेथील पोलीस स्टेशनमधून एनओसी सुद्धा घेतली होती.त्यामध्ये वडेट्टीवार यांच्यावर कोणत्याही केसेस सुरू नाहीत असे नमूद करण्यात आले होते.त्यामुळे भांगडिया यासंदर्भात कोर्टात गेले आणि त्यावेळी कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला नोटीस काढल्या.नंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here