Home इतर चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या…!

चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या…!

221
0

मराठवाडा साथी न्यूज

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ शहरात बी. पी. एड.महाविद्यालयाच्या आवारातच प्रेमीयुगुलाने चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.धक्कादायक म्हणजे मृत तरुणी ही अल्पवयीन होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तोंडाला बांधायच्या स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास बांधून दोघांनी आपले आयुष्य संपविले.मृत तरुणाचे वय १९ वर्ष असून तरुणी अल्पवयीन होती. त्यांच्या प्रेमसंबंधांना घरच्यांकडून विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असेल.असा प्राथमिक अंदाजा लावण्यात येत आहे.

दरम्यान,मोहोळ तालुक्यातील मागील वर्षभरातील प्रेमीयुगुलाची आत्महत्या असणारी ही तिसरी घटना असून या घटनेसंदर्भात पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here