Home कृषी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.

गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.

273
0

पिकावर फटका बसण्याची शक्यता.हवामानातील चढ-उताराचा फटका यावर्षी गव्हाच्या पिकाला बसण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
फेब्रुवारी महिन्यातील ‘क्लायमेट फ्लक्चूएशन’मुळं गव्हाचं पीक कालावधीपुर्वीच पक्वं होण्याची परिस्थिती आहे. रब्बी हंगामात जानेवारीत लागवड केलेल्या गव्हाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय.
आपल्या देशात साधारणत: दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गव्हाची पेरणी केली जाते. तापमानातील चढ-उताराचा सर्वाधिक फटका हा जानेवारीत उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला बसण्याची शक्यता आहे.
गव्हाच्या पेरणीनंतर यावर्षी पिकाला पोषक अशी थंडीही पडली नाही. त्यामुळं त्याचा थेट परिणाम पिकाच्या पक्वतेवर झाला आहे.
जानेवारी महिन्याच्या मध्यापासून अनेक ठिकाणी ऊन आणि थंडीचा खेळ सुरू झाला आहे. दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळं वाढलेला गारठा यामुळे पिकाच उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तापमानातील बदल हे भारतीय शेतीसमोरचं भविष्यातील फार मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं कृषी विद्यापीठं आणि कृषी शास्त्रज्ञांसमोर या संकटावर उत्तर शोधण्याचं मोठं आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here