Home राजकीय मध्यरात्री दिल्ली महापालिकेत राडा , भाजप-आपचे नगरसेवक यांच्यात बाचाबाची

मध्यरात्री दिल्ली महापालिकेत राडा , भाजप-आपचे नगरसेवक यांच्यात बाचाबाची

238
0

दिल्ली : भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये Delhi MCD च्या स्थायी समितीत मध्यरात्री बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला . याच्या निषेधार्थ आप च्या नगरसेवकांनी आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, प्रदीर्घ संघर्षानंतर, आम आदमी पार्टी अखेर दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर बनल्या असून बुधवारी सायंकाळी झालेल्या निवडणुकीत त्यांना 150 मते मिळाली, तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना केवळ 116 मते मिळाली. निवडणुकीत एकूण 266 मतदार होते. मात्र, महापालिकेच्या स्थायी सदस्यांच्या निवडीबाबत सभागृहात गदारोळ व हाणामारी झाल्याचे दिसते. त्याचवेळी आपच्या नगरसेवकांनी निवडणूक होईपर्यंत सभागृह सोडण्यास नकार दिला आहे.
आपचे नगरसेवक संजय सिंह यांनी रात्री 1 वाजल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपवर गोंधळाचे गंभीर आरोप केले. नगरसेवकांनी एकमेकांवर बाटल्या फेकून मारहाण केली . एमसीडीत असा गोंधळ याआधी कधीही झाला नव्ह्ता. अराजकता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आपचे नगरसेवक संजय सिंह यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here